Chhatrapati Sambhajinagar : मोठी बातमी! औरंगाबादच्या नामांतराला MIM चा विरोध; आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो

Imtiaz Jaleel Protest: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला अधिकृत परवानगी दिल्यानंतर या निर्णयाविरोधात खासदार इम्तियाज जलील आजपासून बेमुदत साखळी उपोषण करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे. या उपोषणाच्या पहिल्या दिवशीच छत्रपती संभाजीनगर नावाचा विरोध करीत औरंगजेबाचे फोटोही दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे नामांतराचा वाद आता चांगलाच चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. मात्र याच निर्णयावरुन आता राजकारण तापले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करत आजपासून आंदोलनला सुरूवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवल्याचीही माहिती समोर आली आहे.

मात्र "ज्या व्यक्तींनी फोटो झळकवले आहेत, त्याचा एमआयएम किंवा माझ्याशी काही संबंध नाही. कोणीतरी आमचा आंदोलन मोडून काढावं यासाठी केलेला प्रयत्न आहे," असे स्पष्टीकरण खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहे.

तसेच ज्या व्यक्तीने आंदोलनामध्ये हे फोटो झळकवले आहेच, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही खासदार इम्तियाज जलील यांनी साम टीव्ही शीच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी या आंदोलनाबद्दल बोलताना, "माझे नाव तुम्ही शहराला देऊन मला मोठे करा असे संभाजी महाराजांनी सांगितले होते का? ते महापुरूष आहेत यात काहीही दुमत नाही. त्यांचा आदर करण्यात कोणताही वाद नाही पण त्याबाबत सुरू असणाऱ्या राजकारणाविषयी आक्षेप आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे..



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply