Chhatrapati Sambhaji Nagar : जुन्या विहिरीचे काम करताना घडला भयंकर अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जुन्या विहिरीचे काम करताना विहीर ढासळल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील झोलेगाव जांबरखेडा येथे ही घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील झोलेगाव जांबरखेडा येथे दुर्दैवी घटना घडली आहे. जुन्या विहीरीचे काम करताना विहीर ढासळून अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत विहीर दुरुस्त करणारे पाच कामगार दबले गेले. विहीर कोसळल्याची घटना घडल्यानंतर कामगारांमध्ये एकच भीती पसरली. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

या दुर्दैवी घटनेत तीन कामगारांचा दबून मृत्यू झाला आहे. या घटनेने कामगारांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर इतर कामगारांनी त्यांचे कामगार सहकारी गमावल्याने अश्रू अनावर झाले आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील झोलेगाव जांबरखेडा येथे जुन्या विहीरीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. या जुन्या विहीरीची दुरुस्ती करण्यासाठी काही कामगार आले होते. ही जुनी विहीर करताना अचानक ढासळली. जुनी विहीर दुरुस्त करताना झालेल्या अपघातात पाच कामगार दबले गेले.

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. तर विहीर दुरुस्त करणाऱ्या कामगारांपैकी तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर या विहीरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर या विहीरीमध्ये पडलेली माती देखील काढण्याचं काम सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply