Chhatrapati Sambhaji Nagar Income Tax Department Raids : छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाची छापेमारी; २०० अधिकाऱ्यांकडून बड्या व्यावसायिकांची झाडाझडती

Chhatrapati Sambhaji Nagar Income Tax Department Raids : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरात एकाचवेळी ११ ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तब्बल २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ही छापेमारी करण्यात आली आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाने अचानक धाडी टाकताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  

गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरू केलं आहे. अनेक बडे उद्योगपती तसेच बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील ११ ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या.

Electricity Theft : तब्बल 35 लाखांची वीजचोरी, बारामतीच्या पवारांना जिल्हा न्यायालयाचा दणका; रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत नाही

नाशिक आणि पुणे आयकर विभागाच्या टीमने ही छापेमारी केल्याची माहिती आहे. शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं समजते. या व्यावसायिकांच्या कार्यालयात आणि घरात आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसल्याची माहिती आहे.

दरम्यान, कारवाई नेमकी कोणावर करण्यात आलीय याची माहिती मात्र अद्याप समजू शकलेली नाही. आयकर विभागाने सुरू केलेली ही छापेमारी पुढील दोन ते तीन दिवस चालणार आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply