Chhatrapati Sambhaji Nagar : मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे भुरटे, मृत महिलेच्या अंगावरील सोनं अन् पैसे गायब

 

Chhatrapati Sambhaji Nagar : मयताच्या टाळूवरचं लोणी खाणे. ही म्हण तशी प्रचलित. पण या म्हणीचा प्रत्यय छत्रपती संभाजी नगरमध्ये आला आहे. शासकीय रुग्णालयात चक्क मृत महिलांच्या अंगावरील सोनं आणि पैसे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना छ्त्रपती संभाजी नगरमधील गंगापूरजवळ घडली असून, या प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर गंगापूर पोलिसांनी तातडीने दखल घेत, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हैद्राबाद येथील काही भाविक घृष्णेश्वराचं दर्शन करुन शिर्डीला परतत होते. मात्र गंगापुरजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला. गंगापुरजवळ भाविकांची जीप उसाच्या ट्रकला धडकली. यात ४ जणांचा मृत्यू आणि ११ भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णवाहिकेनं मृतदेह आणि जखमींना गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात नेलं. मात्र, याच दरम्यान त्यांच्या अंगावरील सोनं गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Crime News : मामीच्या प्रेमात भाचा वेडापिसा, नात्याची चाहूल मामाला लागली, दोघांनी काढला काटा

ज्यावेळी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली, तेव्हा त्यात अपघातग्रस्त आणि मृतदेह रुग्णवाहिकेत टाकण्यात आले. त्यावेळी रुग्णांच्या अंगावर सोनं असल्याची माहिती आहे. तसेच काही पैसे देखील होते. रुग्णवाहिका मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहचली. जेव्हा नातेवाईक रुग्णालयात पोहचले तेव्हा त्यांच्या अंगावर सोनं नव्हतं, हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यावेळी त्यांच्या अंगावरील सोनं चोरीला गेल्याचं समोर आलं. त्यामुळे नेमकी ही चोरी कुणी केली? मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या धक्कादायक घटनेनंतर गंगापूर पोलिसांना या संदर्भातली माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अपघात कसा घडला?

हैद्राबादच्या भाविकांचा गंगापूर वैजापूर महामार्गावरील तांबोळगोटा फाट्यावर भीषण अपघात घडला. घृष्णेश्वराचं दर्शन करुन भाविक शिर्डीला परतत असताना हा अपघात घडला. भाविकांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकली. ज्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातात ४ भाविकांचा मृत्यू तर ११ जण जखमी असल्याची माहिती आहे. यात प्रेमलता श्यामशेट्टी, प्रसन्न लक्ष्मी, वैद्विक श्यामशेट्टी, अक्षिता श्यामशेट्टी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply