Chhatrapati Sambhaji Maharaj : औरंगजेबाकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे मूळ पेंटिंग अहिल्यानगरमध्ये


Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सध्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळांना भेट देत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान एका वस्तू संग्रहालयातल्या चित्रामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे.

छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराज यांना फितुरीने पकडल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल करतानाचे दृश्य देखील या चित्रपटात पाहायला मिळते. या घटनेचे मूळ चित्र अहिल्यानगरच्या एका वस्तू संग्रहालयात असल्याचा दावा ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव यांनी केला आहे.

Pune : गुंड गजा मारणे रडारवर, अख्ख्या टोळीवर मकोका लावणार, संपत्तीची चौकशीही होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहायल व संशोधन केंद्रात इसवी सन १७ व्या शतकातील हे मूळ चित्र असल्याचे संतोष यादव यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संग्रहालयात छत्रपती संभाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात झालेल्या भेटीचे हस्तिदंतात कोरलेले मूळ चित्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूळ वंशावळ देखील आहे.

शिवकालीन इतिहास समजून घ्यायचा असेल, तर अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला एकदा भेट द्यावी असे आवाहन संतोष यादव यांनी म्हटले आहे. या वस्तूसंग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित जवळपास अडीचशे पुस्तके; शिवकालीन नाणी, सतराव्या शतकातील तलवारी, ढाली देखील आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply