Chhagan Bhujbal News : मंत्रिमंडळातून मला कधीही बाहेर काढू शकतात; मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal News : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत अध्यादेश काढला. या अध्यादेशाला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आक्रमक झाले. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा, असं विधान आमदार गायकवाड यांनी केलं.

त्यांच्या या विधानालामंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसासह कुणालाही आहे. पण आमदार गायकवाड यांनी जी भाषा वापरली ती बरोबर नाही. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे", असं भुजबळ म्हणाले.

Latur Crime News : आई आणि मोठ्या भावाने मिळून लहान भावाची केली हत्या; घटनेनं लातूर हादरलं

"आमदार संजय गायकवाड यांनी कमरेत लाथ घालून मला बाहेर काढण्याची भाषा वापरली असली तरी मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. राहिला प्रश्न कमरेत लाथ घालण्याचा तर ते असं करणार नाहीत. मला मंत्रिमंडळातून कधीही बाहेर काढू शकतात", असं विधानही भुजबळ यांनी केलं. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *