Chhagan Bhujbal : 'सौ सुनार की एक लोहार...'; भुजबळांच्या सभेची सुरवातच जरांगेंवरील टीकेने; म्हणाले...

Chhagan Bhujbal : इंदापूर येथील ओबीसी मेळाव्यातून पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी काही बोललो की, काही विद्वान लोक बोलायला लागतात की दोन जातीत भांडणे लागत आहेत. जरांगे यांच्या सभा रात्री उशिरा चालते, पोलीस कारवाई करीत नाही. कायदा फक्त आपल्याला त्यांना नाही. मी 15 दिवसांनी एकदा बोलतो, सौ सुनार की एक लोहार... काही बोलावे लागते, सगळंच ऐकून घ्यायची सवय नाही.  राज्यात अशांतता निर्माण कोण करते? असे भुजबळ म्हणाले.

Dombivli Crime News : शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचे ८ वर्षीय मुलीवर अत्याचार; डोंबिवलीतील घटनेने संताप

राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की, नाही कायदा सुव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला.  जालना यथे महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला. मग पोलिसांनी लाठीचार्ज केला असे मी अनेक दिवसांपासून सांगतोय. पण कोणीच काही बोलायला तयार नाही. मात्र,  देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सभागृहात लेखी उत्तर दिले आणि ज्यात त्यांनी 79 पोलीस जखमी झाल्याचे म्हटले आहे. बचाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात 50 जण जखमी झाले. हे आधीच समोर यायला पाहिजे होते. हे आता समोर आल्याचे भुजबळ म्हणाले. 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply