Chhagan Bhujbal : मराठा समाज छगन भुजबळांविरोधात आक्रमक; नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौराच बदलला

Chhagan Bhujbal :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करणारे आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. छगन भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील अवकाळीच्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. मात्र सकल मराठा समाजाने त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी आपल्या दौऱ्याचा मार्ग बदलला आहे.

बुधवारी रात्रीपासूनच येवला तालुक्यातील काही गावात भुजबळांना विरोध करण्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. आज सकाळी देखील विंचूर चौफुली येथे अनेक मराठा बांधव एकत्र जमले आहेत. मराठा बांधवांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Ravikant Tupkar Health : अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची तब्येत खालावली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

छगन भुजबळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. विंचूर चौफील येथे मराठा जमले असल्याने पोलिसांच्या विनंतीनंतर छगन भुजबळ यांनी आपल्या दौऱ्याचा मार्ग बदलला आहे. आता दुसऱ्या मार्गाने भुजबळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. मराठा बांधवांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

नुकसानग्रस्त गावांमधील ९० टक्के लोकांना गावात जाऊन मदत मिळवून द्यावी असं वाटत आहे. ज्यांनी विरोध केला तिथे जाणार नाही. सर्व ठिकाणी जाऊ शकणार नाही. पण काही ठिकाणी पाहणी केल्यानंतर अंदाज येतो. सरकारी कागद आणि त्याची नुकसानीची माहिती येईलच, पण शेतकऱ्यांना आधार द्यावा लागतो, सरकार तुमच्यासोबत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

मी इथला आमदार आहे, मला जावंच लागेल. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी राजकारण करा, मी माझं काम करणार आहे. निवडणुकीच्या वेळी काय ते पहा ना, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply