Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून काढून टाका म्हणणाऱ्या संभाजीराजेंना भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले, तुम्ही एका समाजाचे...

Chhagan Bhujbal : ओबीसींच्या व्यासपीठावरुन जालन्यात छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच चिथावणीखोर भाषण केलं होतं. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळांच्या भाषणावर संताप व्यक्त करत सरकारनं त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणी केली होती.

त्यांच्या या भूमिकेला आज भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इगतपुरी इथं ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. 

Kartiki Ekadashi : कार्तिकी यात्रेसाठी दर्शनरांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात, पहिल्यांदाच 10 विश्रांती कक्ष उभारणार

तुमचा आदर करतो पण...

छगन भुजबळ म्हणाले, "संभाजीराजे काल म्हणाले की भुजबळ दोन समाजात वितुष्ट निर्माण करत आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. संभाजीराजे आम्ही तुमचा आदर सन्मान करतो कारण आमच्या हृदयात असलेले शाहू महाराज ज्यांनी मागासवर्गीयांना वरती आणण्यासाठी त्यांची बाजू घेऊन लढत होते. आम्ही फुले-शाहू-आंबेडकर म्हणतो ना ते शाहू महाराज आहेत"

तुम्ही कोणा एका समाजाचे नाहीत

त्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही तिकडे आहात, तुम्ही एका समाजाचे नाहीत. या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एकाच समाजाची बाजू घेऊ कसे बोलता? एकतर तुम्ही या आरक्षणाच्या आंदोलनात यायलाच नकोत. आलात तर तुम्ही सांगायला पाहिजे की तुम्ही सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा. कोणावरही अन्याय करु नका. ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला आहे, अशा शब्दांत भुजबळांनी संभाजीराजेंना आवाहन केलं.

तेव्हा तुम्ही कुठे होता?

माझ्यावर आरोप करण्यापेक्षा घरदारं कोणी जाळली मी जाळी का? असा सवाल करताना दोन महिने जे काही राज्यात चाललं आहे त्यावेळी तुम्ही गप्प बसलात. तुमचं काम होतं की असं करु नका. तुम्ही स्वतः जायला पाहिजे होतं बीडला. लोकांची घरं जाळण्यात आली, पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले सगळीकडे.

तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला पाहिजे होते ते तुमचं काम नाही का? एक लक्षात ठेवा छगन भुजबळांना मंत्रीपदाची पर्वा नाही आणि आमदारकीची पण पर्वा नाही. तो लढेल गोरगरीबांसाठी लढेल. छत्रपती शाहूंच्या गादीवर तुम्ही बसता त्यामुळं सर्वांना न्याय द्या, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply