Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बॅनर्सवरुन घड्याळ गायब; भुजबळ अजितदादांची साथ सोडणार?

 

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ आणि भाजपची जवळीक वाढतच चाललीय. अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यात नेमकं असं काय घडलं की भुजबळांचा भाजप प्रवेश प्रशस्त झालाय? अमित शाहांनी असं काय केलं की भुजबळ भारावून गेले? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. मंत्रिपदावरून डावलेले नाराज भुजबळ अजितदादांच्या राष्ट्रवादीपासून दिवेसंदिवस लांब जात असल्याचं दिसतंय. कारण मालेगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या स्वागतासाठी लागलेल्या भुजबळांच्या बॅनर्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ आणि दादांचा फोटोही गायब होता.

तर भाजपसोबत त्यांची जवळीक वाढत चालल्याचं दिसतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यात प्रकर्षानं हे चित्र दिसलं.मालेगावात झालेल्या सहकार परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी हजेरी लावली.एवढंच नाही तर दूर बसलेल्या भुजबळांना थेट आपल्या शेजारची खुर्ची देत शाहांनी जवळ बोलवून घेतलं. सभा सुरु असताना अमित शाह आणि छगन भुजबळांमध्ये सुरु असलेल्या गुफ्तगूनंही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Guillain-Barré Syndrome : मेंदू व्हायरसचं थैमान, २४ पेशंट व्हेंटिलेटरवर; केंद्राचं पथक पुण्यात

शाहा एवढ्यावरच थांबले नाहीत तर छगन भुजबळांच्या आग्रहामुळेच मालेगावच्या सहकार परिषदेला आल्याचं अमित शाहांनी आवर्जून आपल्या भाषणात सांगितलं. तर भुजबळांनीही हा आपल्यासाठी मोठा सन्मानच असल्याची भावना व्यक्त केली. भुजबळांना आधी राज्यसभेतून डावलले.त्यानंतर त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवले. त्यामुळे नाराज झालेले भुजबळ भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यांनी यापूर्वी अनेकदा फडणवीसांचंही जाहीर कौतुक केलंय. आता तर थेट पोस्टरवरच घड्याळ गायब करून अमित शाहांच्या जवळ खुर्चीवर विराजमान झालेल्या भुजबळांनी योग्य टायमिंग साधल्याची चर्चा रंगलीय. केवळ आता त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्ताचीच प्रतीक्षा सर्वांना लागल्याचं दिसतंय.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply