Chhagan Bhujbal : "अन्याय झाल्यास ओबीसीही रस्त्यावर उतरेल"; छगन भुजबळांनी दिला इशारा

Chhagan Bhujbal : आज सरकारच्या शिष्टमंडळासोबतची बैठक संपन्न झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाशी आणि आंदोलकांशी वाशी येथील शिवाजी चौकात संवाद साधणार आहेत. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्व मराठा बांधवांशी चर्चा करूनच घेतला जाईल असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. तर मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असलल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाल आरक्षण द्यावं, पण ओबीसींवर अन्याय होता कामा नये असं म्हटलं आहे. उद्या ओबीसींवर अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे ओबीसींचं देखील आंदोलन सुरू होईल. त्यामुळे सरकारने सर्व बाजुंनी विचार करून निर्णय घ्यावा. आम्ही आमची मतं सांगितली आहेत. आम्हाला जी मतं चुकीची वाटतात त्याबाबत आम्ही जाहीरपणे बोलतो, मते मांडतो, असे भुजबळ म्हणाले.  

Maratha Reservation : "जरांगे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल"; मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवारांची भूमिका



कायद्याच्या चौकटीत जे-जे बसेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारण आजकाल कोणीही न्यायालयात जातं. त्याची चिरफाड होते. त्यामुळे नियमात आणि कायद्यात जे बसेल ते देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्या, असं माझंही म्हणणं आहे. पण, ओबीसींवर अन्याय होता कामा नये. या मतावर आम्ही ठाम आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले. 

सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना नवीन जीआर दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते मुंबईत आझाद मैदानावर जाणार की वाशीतून आंदोलन मागे घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply