Chennai Floods : चेन्नईत इतिहासाची पुनरावृत्ती; 8 वर्षानंतर आजच्याच दिवशी शहरात पूर, जनजीवन विस्कळीत

Chennai Floods : तीव्र अल निनो परिणामामुळं बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. यामुळं ८ वर्षांपूर्वीची स्थिती आज पुन्हा अनुभवायला मिळाली. सन २०१५ मध्ये झालेल्या भीषण पावसासारखा पाऊस आज २०२३ मध्ये पुन्हा शहरात अनुभवायला मिळतो आहे. यामुळं इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

चेन्नई तुंबली

मिचाँग चक्रीवादळामुळं चेन्नई शहरातील विविध भागात सध्या तुफान पाऊस सुरु असून ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं ट्रेन, बस, विमानसेवा यांच्यावर वाईट परिणाम झाला आहे. सध्या या सर्व सेवा चेन्नईत ठप्प झाल्या आहेत. चेन्नईचा विमानतळाचं तर शब्दशः तळ्यात रुपांतर झालं आहे. पार्किंगमधील विमानांच्या चहुबाजूनं पाणीच पाणी दिसतं आहे.

Sindhudurg : ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र! पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर

दरम्यान, मिचाँग चक्रीवादळ आणि भीषण पावसामुळं तामिळनाडू सरकारनं राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये उद्या ५ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये कांचीपुरम, थिरुवल्लूर, चेंगलपट्टू, चेन्नई या जिल्ह्यांचा समावेश आहे. उद्या दुपारी १२ वाजता हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा वेग ९०-१०० किमी प्रतितास इतका असेल. दुपारनंतर याचा वेग ११० किमी प्रतितास इतका होईल. पुढे ७ डिसेंबरपर्यंत हे चक्रीवादळ याच भागात राहिल. त्यानंतर याची तीव्रता कमी होत जाईल. 

दरम्यान, या चक्रावादळापासून सुरक्षेसाठी उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना १ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर २ कोटींचा निधी तिरुपतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच जर युद्धपातळीवर पूरस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. दिलासा पथकासोबत वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे.

रिलिफ कॅम्प

किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हालवण्यासाठी १८१ रिलिफ कॅम्प तयार करण्यात आले आहेत. चक्रीवादळाचा परिणाम होणाऱ्या ८ जिल्ह्यांमध्ये हे कॅम्प असणार आहेत. तसेच या भागात ५ एनडीआरएफ तसेच ५ एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply