Cheetah Helicopter Crash : अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर कोसळलं, पायलटचा शोध सुरू

Cheetah Helicopter Crash: अरुणाचल प्रदेशातील मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे.  हेलिकॉप्टरमधील दोन्ही लष्करी पायलट बेपत्ता आहेत. त्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, ते सेंगे ते मिसमरीकडे उड्डाण करत होते. गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी पुष्टी केली की आज सकाळी 9.15 च्या सुमारास चीता हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला.

गेल्या वर्षी देखील चित्ता हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता

यापूर्वी 2022 मध्ये देखील तवांगजवळ भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या अपघातात दोन वैमानिकांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तवांगजवळील फॉरवर्ड भागात उड्डाण करणारे लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टरचा नियमित उड्डाण करताना अपघात झाला होता. दोन्ही वैमानिकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र एकाला वाचवता यश आलं नाही. लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे मृत वैमानिकाचे नाव आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply