Chaskaman Dam : चासकमान परिसरावर पाऊस रुसलेलाच; धरणात फक्त १३.३५ टक्के पाणीसाठा

Chaskaman Dam : खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान (ता. खेड) धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसलेलाच असून, धरणात फक्त १३.३५ टक्के (१.०१ टीएमसी) पाणीसाठा झाला असून, भीमाशंकर परिसरात पडत असणाऱ्या पावसाने पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ होत आहे. त्यामुळे खेड व शिरूर तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे.
मुंबई, कोकण, कोल्हापूर, सोलापूर यासह अन्य परिसरात गेली काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून येथील धरणे ओसंडून वाहताहेत अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून, जनजीवन विस्कळित झालेले आहे. याच्या उलट खेड तालुक्याची स्थिती असून, पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

जून महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्याऱ्यांनी शेतांमध्ये पेरणी केली असून, पिकांची उगवणही जोमदार झालेली आहे. मात्र पावसाने पाठ फिरवली असून, गेल्या दोन दिवसांपासून कहक ऊन पडत आहे. त्यामुळे जमिनीतील ओल सुकणार आहे.

८.५४ टीएमसी क्षमता असलेल्या चासकमान धरणसाठ्याची स्थितीही चिंताजनक असून, जुले महिन्याचे दहा दिवस उलटून गेल्यावरही धरणात जेमतेम तेरा ते चोदा टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी हाच साठा १९ टक्क्यांच्या आसपास होता, तर २८ जुलै २०२३ रोजी धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरणातून विसर्ग करण्यात येत होता.

Worli Hit And Run Case : मिहीर शहानं अपघातानंतर केस-दाढी कारमध्येच कापली!, कोर्टात पोलिसांची माहिती, १६ जुलैपर्यंत कोठडी

श्री क्षेत्र भीमाशंकरच्या खोऱ्यात पडत असणाऱ्या कमी अधिक प्रमाणातील पावसाने भीमा नदीचे पात्र प्रवाहित झालेले आहे. या पाण्यामुळे चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ होत आहे. जून महिन्याच्या सुरवातीला धरणात फक्त ७.५० टक्के (०.५७ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता, तर सद्यस्थितीत दीड महिन्यानंतर त्यामध्ये फक्त सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. वरण परिसरात एक जूनपासून फक्त २२७ मि भी पावसाची नोंद झालेलीआहे
गेल्या वर्षीसारख्या पावसाची अपेक्षा

मागील वर्षी दहा जुलै रोजी धरणात १८.८५ टक्के पाणीसाठा झाला होता व परिसरात १४९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र, त्यानतर पावसाचा जोर वाढून केवळ १७ दिवसात धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाची पाचही दारे उघडून 'भीमा नदीपात्रात ४३४० क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. असाच काहीसा चमत्कार निसगनि केल्यास चासकमान धरण भरण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply