Chandrayaan-3 : 'मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!' चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 चा इस्रोसाठी खास मेसेज

Chandrayaan-3 Successful Landing : भारतसोबतच अबघाया जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-३ ची चंद्रावर यशस्वी लँडिंग झाली आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगबद्दल इस्रोने ट्वीट करून अभिनंदन केले आहे. चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर चांद्रयान-३ ने पहिला मेसेज पाठवला.

इस्रोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "चांद्रयान-३ मिशनचा संदेश - मी माझ्या चंद्रावर पोहोचलो आहे आणि तुम्हीही. चांद्रयान-३ यशस्वी. चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन."

चांद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे, आता सर्वांच्या नजरा प्रज्ञान रोव्हरवर आहेत. प्रज्ञान रोव्हर आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज आहे. प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे आणि अनेक प्रकारचे डेटा करेक्शन करणार आहे.

इस्रोच्या म्हणण्यानुसार, विक्रम लँडरसह चंद्रावर गेलेले प्रज्ञान रोव्हर १४ दिवसात आपले काम पूर्ण करेल. प्रज्ञान ताबडतोब कामाला सुरुवात करेल आणि १४ दिवस सतत काम करेल असे सांगण्यात येत आहे.

Pm Narendra Modi On Chandrayaan 3 : इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला; चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

रोव्हर प्रज्ञान आपला सर्व डेटा विक्रम लँडरला देईल आणि तेथून डेटा थेट इस्रो एजन्सीकडे ट्रान्सफर केला जाईल. चंद्राचा एक दिवस पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो, यानुसार प्रज्ञान केवळ एका चंद्र दिवसासाठी म्हणजेच 14 दिवसांसाठी सक्रिय राहील. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यामुळे ते पुन्हा चार्ज होण्याची शक्यता कमी आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांना मात्र खात्री आहे की, प्रज्ञान आणि विक्रम अतिरिक्त चांद्र दिवस टिकू शकतात. जिथे त्यांना सौरऊर्जेने स्वतःला चार्ज करण्यास मदत होईल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply