Chandrashekhar Bavankule : सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी,चंद्रशेखर बावनकुळे यांची देवेंद्र फडणवीसांना विनंती

Chandrashekhar Bavankule : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मोठे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे  यांनी केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, 'आज महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या संपूर्ण ४८ मतदारसंघाच्या विधानसभेसहित विश्लेषणाची बैठक आमच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची झाली. या बैठकीत दीड ते दोन तास आम्ही सर्वांनी चर्चा केली. त्यानंतर जे काही आम्ही चिंतन करणार आहोत त्यामधून आम्ही पुढे जाणार आहोत. पुढच्या काळात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये भाजपला आणि महायुतीला चांगले यश मिळेल या दृष्टीने आम्ही १५ दिवसांत रोड मॅप तयार करणार आहोत. याद्वारे महायुती आणि भाजपची टीम या महाराष्ट्रात मताची टक्केवारी कशी वाढेल, आमचे मतदान कसे वाढले, जनतेचे प्रश्न कसे सुटतील, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील यासंदर्भात आम्ही चर्चा केलीये. त्यानंतर आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला.'

Lok Sabha Result 2024 : "एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान", फडणवीसांच्या घोषणेनंतर मोहित कंबोज यांचं ट्वीट!

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे सांगितले, 'देवेंद्रजींनी बैठकीनंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी या महाराष्ट्रातल्या संपूर्ण पुढच्या निवडणुकीसाठी आणि संघटनेकरता मी पूर्णवेळ देईल. त्यासाठी मी केंद्राची परवानगी घेईल असे विधान केले. देवेंद्रजींची भूमिका संघटनेसाठी अत्यंत महत्वाची राहिली आहे. आधीही कोअर ग्रुपमध्ये यासंदर्भात कुठलीही चर्चा त्यांनी केली नाही. मला पूर्णवेळ त्याठिकाणी सरकारच्या बाहेर येऊन काम करण्याची इच्छा असल्याची भावान त्यांनी व्यक्त केली. पण आम्ही सर्व कोअर ग्रुपचे सदस्य सरकारच्या बाहेर येऊन त्यांनी काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत. सरकारमध्ये काम करून संघटनेला चार दिवस देता येतो. आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकते अशी आमची सर्वांचीच मानसिकता आहे.'

चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे देखील सांगितले की,'संपूर्ण राज्याला मी सांगतो की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही. त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे. यासंर्भात आम्ही सर्वांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. ते आमच्या सर्वांचा निर्णय मान्य करतील अशी अपेक्षा आहे. थोडासा निकाल किमी आल्यामुळे आमच्या सर्वांना दु:ख आहे. ही एकट्या देवेंद्रजींची जबाबदारी नाही ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढच्या काळात आम्ही देवेंद्रजीसोबत एकत्र येऊन आम्ही काम करू.' तसंच, देवेंद्र फडणवीसांची मागणी केंद्रही मान्य करणार नाही अशी आमची इच्छा आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात भविष्यात यश येईल.', असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply