Chandrapur News : धक्कादायक! 9 महिन्याच्या बाळाला विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा, चंद्रपुरात हळहळ

Chandrapur News : 9 महिन्याच्या बाळाला विष देऊन आईने आपली जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे ही घटना घडली आहे. यामुळे पल्लवी पारोधे (27) असं मृत महिलेचं नाव आहे. तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तर 9 महिन्याच्या मुलाला आत्महत्येपूर्वी तिने विष दिल्याचे झाले निष्पन्न झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवतीसोबत लग्न झाले. त्यांना ९ महिन्याचा मुलगा आहे. मात्र पल्लवी पारोधे या विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तर 9 महिन्याच्या मुलाला आत्महत्येपूर्वी तिने विष दिल्याने एकाच खळबळ उडाली.

Buldhana News : काळजी घेऊनही बुलाढाण्यात डेंग्यू, चिकनगुनियाचा शिरकाव, आराेग्य विभाग अलर्ट

 मुलाची प्रकृती स्थिर असल्याची पोलिसांची माहिती 

पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध अवस्थेत तर पल्लवी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पल्लवी हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आला आहे. तर मुलाला चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply