Chandrapur News : राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत १० पट वाढ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chandrapur News : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

चंद्रपूर येथील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. तर बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

Mumbai Fire Break Out : मुंबईत शॉपिंग मॉलला भीषण आग; 11 जणांची सुटका, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

खेलो इंडिया, फिट इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 2036 मध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. 

चंद्रपूरचे नाव देशभरात अभिमानाने घेतले जाईल, असे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जाहीर झाल्याची घोषणा तसेच मिशन ऑलिम्पिकची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply