Champai Soren : झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन; राज्यपालांसमोर पार पडला शपथविधी

Champai Soren : झारखंडच्या मुख्यमंत्री पदी मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन विराजमान झाले आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासमोर हा शपथविधी पार पडला. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी त्यांना १० दिवसांचा कालावधी दिलाय.

चंपाई सोरेन यांची राजकीय कारकिर्द

चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्च्याचे वरिष्ठ नेते आणि उपाध्यक्ष आहेत. चंपाई सोरेन हे सरायकेला मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यांच्याकडे आदिवासी कल्याण विभागाचा कार्यभार आहे. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातही चंपाई सोरेन यांचा सामावेश होता. त्यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी होती. तर याआधी अर्जुन मुंडा सरकारच्या कार्यकाळातही त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे.

Pune Crime News : पुणे हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक फोन; रुग्ण रस्त्यावर, पुण्यात एकच गोंंधळ

चंपाई सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील वरिष्ठ नेते शिबू सोरेन यांच्या जवळचे मानले जातात. चंपाई हे झारखंडमध्ये 'टायगर' नावानेही ओळखले जातात.

हेमंत सोरेन यांनी ३१ जानेवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंपाई सोरेन हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली होती. आज अखेर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply