Chakan News : मक्याच्या शेतात गांजाची लागवड; चाकण पोलिसांकडून साडेअकरा लाखाचा गांजा जप्त

Chakan News : गांजाची लागवड करण्यास परवानगी नसताना शेतात लागवड केलेल्या पिकांमध्ये गांजा लागवड केली जात असते. असाच प्रकार चाकण  जवळील आगरवाडी येथे समोर आला असून एका शेतकऱ्याने मक्याच्या शेतात गांजाचे पिक घेतले. पोलिसांनी यावर कारवाई करत २६ किलो गांजा जप्त जप्त केला आहे.

आगरवाडी रोड (चाकण) सदाशिव आप्पासाहेब देशमुख (वय ६५) असे गांजाचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना आगरवाडी रोडवर एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, चाकण  पोलिसांनी चाकण- काळूस रोडवर असलेल्या देशमुख यांच्या शेतात जाऊन खात्री केली.

Nashik Bus Fire : नाशिकमध्ये धावत्या ST बसला अचानक आग, वाहनात होते ३५ ते ४० प्रवासी

मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. तब्बल आठ ते दहा फूट उंचीची ६६ झाडे पोलिसांना मिळाली. या झाडांचे वजन २३ किलो असून त्याची किंमत ११ लाख ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी हि गांजाची झाडे जप्त करत सदाशिव देशमुख याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply