Murder Case : लग्नास नकार दिला म्हणून एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निघृण खून; गळ्यावर, पोटावर चाकूने सपासप वार

Chakan  : येथील औद्योगिक वसाहतीमधील आंबेठाण (ता. खेड) गावच्या हद्दीत एका तरुणीच्या गळ्यावर, पोटावर चाकूने वार करून तिचा निघृणपणे खून (Murder Case) करण्यात आला. प्राची विजय माने (वय 21, रा. उरुण इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
तरुणीच्या खून प्रकरणी अविराज रामचंद्र खरात (वय 22, रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राचीने लग्नास (Marriage) नकार दिल्याने आरोपीने चिडून जाऊन तिच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून तिचा निघृणपणे खून करून पळून गेला होता. त्या आरोपीला पोलिसांनी बारा तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिली.
आरोपीच्या मूळ गावी जाऊन घेतला शोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास आबेठाण ता. खेड येथे हा प्रकार घडला. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस हवालदार आढारी, सानप, भोसुरे, हणमते, पोलीस शिपाई काळे, सूर्यवंशी, जैनक, बाळसराफ या पोलीस पथकाने आरोपीच्या मूळ गावी सागली येथे जाऊन, तसेच घटनास्थळावरील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून व तांत्रिक विश्लेषणात्मक तपास करून आरोपीचा शोध घेतला.

Baramati News : तक्रार देण्यासाठी युवक गेला, टोळक्याला राग अनावर, पाठलाग करत पोलीस ठाण्यातच फिर्यादीला मारहाण, काय घडलं ?


सातारा-कराड महामार्गावर रचला सापळा

आरोपी सातारा ते कराड रोडवर त्याच्याकडील दुचाकीवरून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने सातारा ते कराड महामार्गावर सापळा रचून दहा ते पंधरा किलोमीटर आरोपीचा पाठलाग केला. आरोपी दुचाकी न थांबवता दुचाकी वेगात पुढे नेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना पथकातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण तीन मोबाईल व दुचाकी ताब्यात घेतली. याबाबत काही माहिती नसताना पोलिसांनी हा तपास केला.
पोलिसांकडून अधिक तपास सुरु

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस हवालदार यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हणमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधीर दागट, शशिकांत नांगरे, समीर काळे, राहुल सूर्यवंशी, नागेश माळी यानी केली आहे.
लग्नास नकार दिल्याने खून

आरोपी व खून झालेली तरुणी यांचे दोन-तीन वर्षांपूर्वी प्रेम संबंध होते. नंतर ही तरुणी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला आली. त्यानंतर तिने आरोपीशी संपर्क तोडला. कंपनीतील एकाशी ती बोलत होती. तिने संपर्क तोडल्याने व लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिबा खून केला. ही तरुणी एका खासगी कंपनीत काम करत होती. ती तिच्या मैत्रिणीसह आंबेठाण येथे राहत होती.

आरोपी आंबेठाण येथे आला होता. प्राचीशी मोबाईलवर संपर्क केला व तिला बोलावून घेतले. मोकळ्या पटांगणावर त्याने तिला बोलावले. तिचा मोबाईल त्याने हिसकावून घेतला. त्यानंतर तिच्याशी बाचाबाची केली. त्यानंतर त्याने तिच्यावर वार करून तो दुचाकीवरून पसार झाला होता. आरोपी त्याच्या मूळ गावी नोकरी करत होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply