CET Exam : सेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, अभ्यासाला एक महिन्याचा वेळ मिळणार

 

CET Exam Date 2025 : सेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. ही परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे. ४ मे रोजी आधी ही परीक्षा होणार होती. सेट परीक्षा आता जून महिन्यात 15 तारखेला आयोजित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला अतिरिक्त वेळ मिळणार आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मे महिन्यात 4 तारखेला होणारी परीक्षा आता जून महिन्यात 15 तारखेला आयोजित केली जाणार आहे, विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

Nanded : पैनगंगा नदीतून गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास; पुलाअभावी लाकडी तराफ्याचा वापर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिसेंबर महिन्यात सेट परीक्षेच्या नियोजना संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार सेट परीक्षा 4 मे 2025 रोजी आयोजित केले जाणार होती. परंतु विद्यापीठाने संबंधित परिपत्रक रद्द केले असून आता सेट परीक्षा 15 जून रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक महिना अभ्यास करण्यासाठी मिळणार आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागाने आतापर्यंत 39 सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने ओएमआर शीट द्वारे घेतल्या आहेत. चाळीसावी सेट परीक्षा सुद्धा ऑफलाइन पद्धतीने जाणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेत बदल केला असला तरी परीक्षेच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही; याची विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply