Central Railway : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता १५ डब्ब्यांच्या लोकल दुप्पट होणार

Central Local Train: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर आता १५ डब्ब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवणार आहे. आता यासाठी सीएसएमटीची जुनी इमार पाडण्यात येणार आहे. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या विस्तारासाठी अडचण असणारी जुनी रुट रिले इंटरलॉकिंग इमारत पाडली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहहे. कारण, १५ डब्ब्यांच्या एकूण ४४ लोकल मुख्य मार्गावर धावणार आहे. याआधी फक्त २२ फेऱ्या व्हायच्या.

मध्य रेल्वेने सीएसएमटी येथे सिग्नलिंग यंत्रणेत सुधारणा केली आहे. सिग्नलिंगचे सर्व कामकाज नवीन इमारतीत सिफ्ट करण्यात आले आहे.

Mumbai Accident : मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; २ तरूणांचा जागीच मृत्यू

सिंग्नलिंगची जुनी आरआरआय इमारत रिकामी झाली आहे. त्यामुळे ती पाडमार आहे. ही इमारत पाडल्यावर तब्बल ४०० चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे प्लॅटफॉर्म ५ आणि ६ ची लांबी वाढवली जाणार आहे. यासाठी ११ कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

या दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी सध्या २९० आहे तर ती आहे ३९० मीटर होणार आहे. या प्लॅटफॉर्मवरुन १५ डब्ब्यांच्या लोकल चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply