CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत

CBSE New Rule : आता बातमी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. CBSE बोर्डाकडून दहावीच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महत्त्वाची बैठक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली. नक्की काय बदलणार? पाहुयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा असतो...कारण त्यावर पुढील क्षेत्र कोणते असेल..पुढच्या शिक्षणाची दिशा ठरते. काही विद्यार्थी आजारपणामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे दहावीच्या परीक्षेला अनुपस्थित रहातात. त्यामुळे त्यांना पुढची संधी थेट ऑक्टोबरमध्ये मिळते आणि त्यांचे ते महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष वाया जाते.

मात्र आता यावर तोडगा म्हणून सीबीएसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत २०२६ च्या शैक्षणिक वर्षापासून दहावीची परीक्षा दोनदा घेण्यासंदर्भात चर्चा झाली.

Pune Metro : पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, शिवाजीनगर मेट्रोला ऑक्टोबरचा मुहूर्त; प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण

सलग दुसऱ्यांदा परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या त्यांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येतील.

संबंधिताच्या प्रतिक्रिया आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत

नव्या नियमांचा सविस्तर अहवाल लवकरच सादर होणार आहे.

हा निर्णय अंतिम झालाच तर अनेक विद्यार्थ्यांचे वाया जाणारे शैक्षणिक वर्ष वाचेल की काही ,सर्वोत्तम गुणांच्या पर्यायामुळे या निर्णयाचा गैरफायदा घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply