मावळ : इंद्रायणी नदीत कार कोसळली; एक ठार

मावळ : तळेगाव इंदोरी राष्ट्रीय महामार्गावरील जुना इंद्रायणी पुलावरील नदीत एक चार चाकी पाण्यात कोसळली आहे. या वाहनाच्या शेजारी एक मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळला. पाेलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही चार चाकी नदी पात्रात दिसताच एका सजग नागरिकाने आंबी एमआयडीसी पोलीसांना याची दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी तळेगांव आंबी पोलीस दाखल झाले. वाहन पाण्यात तरंगत असल्याने त्याचा क्रमांक समजू शकला नाही.

तळेगांव आंबी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. या वाहना शेजारील मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असून ताे नदी पात्रातून बाहेर काढण्यासाठी पाेलीसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

 
 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *