Cabinet Meeting Decision : अवकाळीमुळ संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 9 निर्णय

Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.

या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मदत व पुनर्वसन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतीन इतर महत्त्वाचे निर्णय

>> ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद. (महसूल विभाग) 

>> नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार. (नगर विकास-१)

> देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल. (नगर विकास-१)

>> सेलर इन्स्टीट्यूट "सागर" भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण. (महसूल)

>> अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

>> महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी. (ऊर्जा)



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply