Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता देण्यात आली आहे. यामार्फत लाखो कामगारांचे हित जपले जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
-
केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
-
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार.
-
‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार.
-
सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता
-
महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
-
राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
-
कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
-
सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार
-
बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय
-
अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार
-
नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता
-
नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण-
-
राज्यात ९५ हजार कोटींची गुंतवणूक तर ३.५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट
-
मंत्रिमंडळ बैठकीत नव्या धोरणाला मंजुरी
-
महाराष्ट्राच्या विकासात नवीन आयटी पॉलिसी गेम चेंजर ठरणार
-
आयटी क्षेत्राचा विस्तार राज्याच्या सर्व भागात होणार
-
आयटी उद्योगांना वीज, एफएसआयमध्ये सवलत
-
कुशल मनुष्यबळ विकसित होऊन कौशल्य वृध्दीमध्ये प्रतिवर्षी १५ टक्के एवढी वाढ होणार
-
१० लाख कोटी एवढ्या निर्यातीचे लक्ष
-
राज्य शासन माहिती तंत्रज्ञान इंटरफेस (MAHITI) सुरू करणार आहे. याव्दारे कालबद्ध मंजुरी, घटक नोंदणी, प्रोत्साहन आणि इतर विस्तार सेवा आणि मैत्रीद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतील.
-
स्टार्टअप व इनोव्हेशन- सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम, नवउदयमशील घटक, उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता ५०० कोटी एवढा निधी उभारण्यात येईल
-
वॉक-टू-वर्क: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल.
-
भविष्यातील कौशल्ये: एआय, सोल्यूशन आर्किटेक्ट, डेटा वैज्ञानिक, ऑप्टिकल वैज्ञानिक, एम्बेडेड सोल्यूशन्स अभियंता आदींवर फोकस असेल.
-
टॅलेन्ट लॉन्चपॅड: राज्यभरातील माहिती तंत्रज्ञान व माहिती क्षेत्रासाठी 'टॅलेंट लाँचपॅड' विकसित करण्यासाठी उद्योग विभाग, कौशल्य विकास विभाग आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग एकत्रितरित्या काम करतील. सध्याची महाविद्यालये, कौशल्य संस्था आणि कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी प्रशिक्षण केंद्रे यांना स्पर्धा आणि हॅकाथॉनद्वारे मदत केली जाईल.
-
प्रादेशिक विकासः झोन-१ वगळता इतर प्रादेशिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, सदर क्षेत्राच्या शाश्वत आणि संतुलित प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मोठ्या माहिती तंत्रज्ञान घटकांसह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या वाढीस सहाय्य करण्यासाठी हस्तक्षेप करण्यात येईल.
-
उद्योगाधारित कार्यप्रणाली / संरचना: महाराष्ट्र हब (M-Hub) अंतर्गत Chief Operating Officer यांची महाराष्ट्राचे तंत्रज्ञान राजदूत (Technology Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात येईल. त्यांच्याद्वारे खाजगी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून धोरण आणि कार्यप्रदर्शन आदेशाचे (Performance Mandate) प्रतिनिधित्व आणि व्यवस्थापन करणे व राज्याच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये जागतिक सर्वोत्तम पद्धती राबविण्यात येईल.
-
एव्हीजीसी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रास सहाय्य: राज्याच्या एव्हीजीसी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रास (AI-ML, Big Data, Robotics etc.) विशिष्टपणे सहाय्य करण्यासाठी धोरणामध्ये आर्थिक व बिगर आर्थिक प्रोत्साहनांचा अंतर्भाव करुन गुणवत्ता, जागा, निधी व भरती प्रकीया इत्यादी करीता सहाय्य करण्यात येईल
-
शहर
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
- Dadar News : मुंबईत 'उडता पंजाब'! दादरमधून ५ किलोचा ड्रग्ज जप्त, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- Kalyan News : मुंबई लोकलमध्ये राडा, धक्का लागला म्हणून ३ जणांवर चाकूने हल्ला
महाराष्ट्र
- Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार
- Nagpur Crime : नागपूर हादरले; लग्न मंडपातच हत्या, दुसऱ्या घटनेत किरकोळ वादातून मित्राचा खून
- Navi Mumbai News : नेरूळच्या तलावात पाण्यावर तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह; नवी मुंबईत खळबळ
- Sand Mafia : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले; ४० डंपर मालकांना १५० कोटींचा दंड, जिल्हाधिकारींकडून नोटीस
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू