CAA Act : भारताने आतापर्यंत पाकिस्तान, बांगलादेशातील किती लोकांना दिलं नागरिकत्व? समोर आली मोठी आकडेवारी

CAA Act : देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीएए देशासाठी वाईट असल्याचं म्हटलं आहे. याचा फटका ईशान्येकडील जनतेला सहन करावा लागणार आहे. बांगलादेशातून मोठ्या संख्येने लोक तेथे येतील, त्यामुळे त्यांची भाषा धोक्यात आहे, पाकिस्तानचे लोक इथे स्थायिक होतील. या देशांमध्ये अडीच ते तीन कोटी अल्पसंख्याक असल्याचं केजरीवाल यांचं म्हणणं आहे.

2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून येथे आलेल्या अल्पसंख्याकांना सीएए अंतर्गत भारताचं नागरिकत्व देण्यात येणार आहे. मात्र भारत यापूर्वीही पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील लोकांना नागरिकत्व देत आहे. गेल्या 5 वर्षात येथून भारतात आलेल्या अनेक लोकांना नागरिकत्व देण्यात आलं आहे. गेल्या 5 वर्षात परदेशातून आलेल्या 5220 लोकांना भारतीय नागरिकत्व मिळालं आहे. त्यापैकी ८७ टक्के म्हणजे 4552 लोक पाकिस्तानातून आले आहेत. 2021 मध्ये सर्वाधिक 1580 लोकांना नागरिकत्व देण्यात आलं. त्याच वेळी, 2018 मध्ये किमान 450 लोकांना नागरिकत्व देण्यात आलं आहे.

Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज निवडणूक लढणार, प्रत्येक गावातून असणार दोन उमेदवार

 

पाकिस्ताननंतर अफगाणिस्तानच्या लोकांना सर्वाधिक नागरिकत्व मिळालं आहे. पाच वर्षांत अफगाणिस्तानातून आलेल्या ४११ जणांना नागरिकत्व मिळाले. तर बांगलादेशातील 116, अमेरिकेतील 71 आणि श्रीलंकेतील 70 जणांनी भारतीय नागरिकत्व मिळवलं. गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर २०२१ मध्ये विदेशी लोकांना सर्वाधिक नागरिकत्व मिळाल्याचे दिसून आलं. यावर्षी १७४५ लोकांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं. त्यामध्ये सर्वाधिक लोक 1580 पाकिस्तानमधील आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply