Tamhini Ghat Bus Accident: लग्नाला जाणाऱ्या 'चाकण'करांवर काळाचा घाला! ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स पलटी, 5 जणांचा मृत्यू

Bus Accident : ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती.

तीन महीला, दोन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढले, अद्याप दोन बसमध्ये अडकले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 13 जण गंभीर जखमी आहेत.

माणगाव पोलिसांची त्वरीत कारवाई

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतल बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस, रेस्क्यू टीम, आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी पोहोचली अ जखमींना शक्य तितक्या लवकर उपचार मिळावेत यासाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai : ‘मेरिटाईमच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करावी’

जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पोस्को कंपनीची ऐम्ब्युलन्सही घटनास्थळी पोहोचली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे नेमके कारण अजून अस्पष्ट

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्परलेले नाही ताम्हिणी घाट हा आपल्या योदय कक्षणासाठी ओळखला आतो. या भागात पावसात रस्त्याची अवस्था अधिकाने या अभपाताचे कारण सून पुढील कार्यवाही आहे

ताम्हिणी घाटात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्यामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाटातील अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, आणि खराब हवामान यामुळे हा भाग प्रवाशांसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply