Bus Accident : मंचर जवळ दोन एसटी गाड्यांचा अपघातः तीन प्रवासी जखमी

Bus Accident : जुन्या पुणे नाशिक महामार्गावर मंचर- शेवाळवाडी (तालुका आंबेगाव) येथे एका एसटीला मागच्या बाजूने दुसया एसटीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी आले आहेत. दोन्ही एसटीतील ४६ प्रवासी तुम वाचले जेथे अपघात झाला. तेथे सिमेट कारखान्यातकाम करणारेतीन-चार मजूर पावसामुळे आडोशाला ल्यामुळे माठी दुर्घटना टळली आहे. मंगळवारी ( ता 25) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अपघाताची घटना घडली.

पुणे ते आळेफाटा (एम एच 20 बी एल 1382) शिवाजीनगर आगाराची एसटी गाडी ने शेवाळवाडी येथील पूल ओलाडल्यानंतर व्यवस्थित ब्रेक लागत नाही असे चालक लखन राठोड यांच्या लक्षात आले. त्यांनी एसटी डाव्या बाजुला घेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात पाठीमागून भरधाव आलेल्या सासवड पुणे मार्गे नाशिक (एमएच 14. एचजी 8481). एसटीचे चालक तात्या सरपोतदारयांना गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने समोर उभ्या असलेल्या एसटीला जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही एसटी गाड्याचे मोठ्या प्रमाण नुकसान आले आहे. नाशिक ला जाणाऱ्याएसटीतील दिपाजी देवाजी डा करे (वय 59) कांताबाई ढाकरे (दोघे राहणार शिंगवे पारगाव तालुका आवेगाव) अर्जुन धर्मा कुराडकर (वय 53 राहणार देवळाली नाशिक रोड नाशिक) हेतीन प्रवासी जखमी आली असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. प्रिया चव्हाण व अन्य डॉक्टराचे पथक उपचार करत आहेत जखमींची प्रकृत्ती व्यवस्थित असल्याचे डॉ चव्हाण यानी सागितले.

Mumbai Best Bus Accident : बोरिवलीत भरधाव बेस्ट बसने दुचाकीला उडवलं; ५ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, आजोबा जखमी

दरम्यान घटनास्थळी मंचर एसटी आगाराचे आगारप्रमुख बालाजी सूर्यवंशी यानी भेट देऊन प्रवाशांना धीर दिला. अम्मा एसटी गावामध्ये प्रवाशांना बसून त्याची पुढील प्रवासाची व्यवस्था केली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सतीष माडगे यानी भेट देऊन रपंचनामा केला आहे.

अपघात घडला त्या ठिकाणी सिमेंटचे खाब खिडक्या व अन्य वस्तू तयार करण्याचा कारखाना आहे. उत्तर प्रदेशातील कामगार काम करत असतात. तसेच विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची येथे नेहमी वर्दळ असते. पण पाऊस पडत असल्याने सुदैवाने तेथे कोणी नवहते. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply