Bus Accident : बस- ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू, प्रवाशी जखमी

Bus Accident : मनमाड- मालेगाव महामार्गावर मनमाडहून नंदूरबारकडे जात असलेली एसटी बस व कांद्याने भरलेल्या ट्रॅकरचा अपघात  झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. 

नाशिकच्या चोंडी घाटाजवळ बस व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र कांदा  फेकला गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचत त्यांनी अधिक तपास सुरु केला आहे. सकाळच्या सुमारास मनमाडला कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर जात असताना हा अपघात झाला. 

Breaking News : १५ हजार लोकांना मिळणार हक्काची घरं, देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे आज PM मोदींच्या हस्ते लोकार्पण

ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू 

अपघात होऊन जोरदार धडक बसल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक हा कानडगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर बस चालक- वाहकासह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply