Buldhana News : प्रवासादरम्यान लक्झरी बसमधून ६० लाख रुपयाची चोरी; आरोपीला ४९ लाख रकमेसह अटक

Buldhana News : खासगी बसने प्रवास करत असताना प्रसादरम्यान तब्बल ६० लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना १० फेब्रुवारीला  घडली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपस केला असता रोकड चोरणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशमधून  ताब्यात घेतले आहे. नांदुरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अकोला येथील प्रमोदसिंग परमार हे अंगड़िया कुरियर सर्व्हिसचे मालक अकोला येथून एका खाजगी लक्झरी बसने अकोल्याहून मुंबईला १० फेब्रुवारी रोजी जात होते. दरम्यान प्रवास करित असताना चालकाने जेवणासाठी वडनेर येथे बस थांबविली. जवळपास सर्वच प्रवाशी यावेळी खाली उतरले होते. यावेळी परमार हे देखील बस खाली उतरले होते. हीच संधी साधत परमार यांनी बसमध्ये ठेवलेली ६० लाख रुपये असलेली बॅग अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले होते. 

Dandapatta As State Weapon : शिवजंयतीदिनी दांगपट्ट्याला राज्यशस्त्राचा दर्जा मिळणार, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

४९ लाख रुपये हस्तगत 

पोलिसांनी तपास करत बॅग चोरी करणारा आरोपी हा मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी मध्यप्रदेशमधून आरोपीला मुद्देमालासह अटक केली. गुन्ह्यातील आरोपी अजय मुकेश उपाध्याय (वय २२( यांचेकडून चोरीस गेलेले रक्क्मेमधील ४९ लाख रूपये सुद्धा नगदी रक्कम हस्तगत करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply