Buldhana : मतदानादिवशी गोंधळ; ३ बोगस मतदार पकडले, दोन गाड्यांत भरून मतदार आणल्याचा काँग्रेसचा आरोप

Buldhana : बुलढाणा नगरपालिका निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यात ३ बोगस मतदारांना पकडले गेले आहेत. बुलढाण्यात बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणाला पकडण्यात आले. या तरुणाला मतदान प्रतिनिधींनी चांगलाच चोप दिला. तर काँग्रेसने घाटाखालून २ गाड्या भरून बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे.

बुलढाण्यात बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणाला पकडण्यात आले. या तरुणाला पळवून लावण्यात आले. यामुळे शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला होता. तर बुलढाण्यातील प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. याठिकाणी दोन बोगस मतदारांना पकडण्यात आले. वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता. मोताळा येथील एका व्यक्तीने मतदान केल्यानंतर पकडण्यात आले.

Nagarparishad Election Result : मोठा निर्णय! उद्याची मतमोजणी रद्द; उमेदवारांचे भवितव्य आता २१ डिसेंबरला ठरणार, हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

त्याच्यासोबत याठिकाणी आणखी एक जण बोगस मतदान करण्यासाठी आला आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही जण बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलिस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातून बोगस मतदार आणून त्यांच्याकडून मतदान करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार दत्ता काकास यांनी केला आहे. याला पुष्टी करणारे अनेक व्हिडिओही समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. तर काही मतदारांना बोगस मतदान करताना पकडण्याची माहिती उमेदवारांनी दिली आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *