Buldhana : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Buldhana : सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. यामुळे अनेकांचे उपवास सुरू असून या उपवासासाठी भगरीचा भात खाल्ल्याने काही महिलांना विषबाधा झाली. देऊळगावराजा तालुक्यातील सरांबा, टाकरखेड या गावातील महिलांना त्रास झाला असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. अनेकांचे उपवास हे फराळावर सुरु आहेत. एकवेळ फराळ करून महिलावर्ग उपवास करत आहे. अशाच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील सरांबा व टाकरखेड येथील महिलांनी उपवास असल्याने भगर करून खाल्ली. मात्र भगर खाल्ल्यानंतर गावातील काही महिलांना मळमळ व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. रुग्णालयात तपासले असता भगरीतून विधाबाधा होऊन त्रास होत असल्याचे समोर आले आहे.  

Chembur Fire : चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM शिंदेंकडून पाहणी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहिर

दरम्यान महिलांनी भगरची उसळ खाल्याने मळमळ व पोटदुखी व्हायला लागल्याने त्यांना तातडीने देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णाल्यात भरती करण्यात आले. त्यात भगर खाल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले. यातील ९ महिलांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यातवर उपचार् सुरु आहे. तर काहीना खाजगी रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply