Buldhana News : शाळेत येत मुख्याध्यापकाने संपविले जीवन; जानेफळ येथील घटना

Buldhana News : रोजच्या वेळेवर शाळेत आलेल्या मुख्याध्यापकाने शाळेच्या एका खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरची घटना  बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथील शाळेत घडली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर  तालुक्यातील जानेफळ येथील श्री शिवाजी हायस्कूल या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले रत्नाकर शिवाजी गवारे (वय ५५) यांनी आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास शाळेतील समोर आली. शाळेतील शिपायाला मुख्याध्यापक गवारे हे गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आले. गवारे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची माहिती तात्काळ जानेफळ पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.  

Follow us -

Nashik Lok Sabha : ठाकरे गटातच बंडखोरी? महायुतीत ठिणग्या; नाशिकचं राजकारण ढवळलं!

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

मुख्याध्यापक रत्नाकर गवारे यांनी शाळेतच आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान गवारे यांनी आत्महत्या का केली; याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply