Buldhana News : होळी दिवशीच शेतकरी बाप-लेकाचा अपघात; पित्याचा जागूच मृत्यू

Buldhana : शेतातील काम आटोपून घरी जाणाऱ्या पितापुत्राच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने वेगात धडक दिली. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. ऐन होळीच्या दिवशी हतेडी खुर्द शिवारानजीत ही दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी म्हातारजी चव्हाण (५५ वर्ष ) असे मृत पित्याचे नाव आहे. विशाल शिवाजी चव्हाण (२८ वर्ष) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोघं बापलेक केसापूर येथील शेतातील काम आटोपून घरी माळविहीरकडे निघाले होते. मात्र मध्येच एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात शिवाजी म्हातारजी चव्हाण यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशाल गंभी जखमी झाला आहे.

Vijay Shivtare : ठरलं! बारामती लोकसभा अपक्ष लढवणार; विजय शिवतारेंची मोठी घोषणा

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. विशाल चव्हाण याला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. चालक प्रमोद जय नारायण तुपकर (रा. काँग्रेस नगर , बुलढाणा ) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *