Buldhana Heavy Rain: रायपूर शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस; तालुक्याशी संपर्क तुटला

बुलढाणा : हवामान विभागातर्फे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर गाव परिसरात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे तालुक्याशी गावाचा संपर्क तुटला आहे. 

आजपर्यंत परिसरातील नदी नाल्यांना पूर आले नव्हते. सकाळी कडक ऊन पडलेले होते. परंतु अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन या परिसरामध्ये एक तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी- नाले भरून गेले आहेत. संपूर्ण पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडला नव्हता. सोयाबीन पिकाला पावसाची अत्यंत आवश्यकता होती. पिंपळगाव, सराई, रायपूर नदीच्या वरून पाणी वाहत असल्यामुळे जवळपास या रस्त्यावरील चार तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.

Rohit Pawar News : रोहित पवार यांना मोठा दिलासा; हायकोर्टाचे ६ ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

गावाचा संपर्क तुटला 

पिंपळगाव, सराई, रायपूर परिसरामध्ये आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे एका तासात नदी नाल्यांना पूर आला. आजच्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. परंतु बुलढाणा तालुक्यात रायपूर नदीला पूर आला असून बुलढाणा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply