Buldhana Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, 5 लाखांची दारु जप्त, 43 जणांना अटक

Buldhana Crime News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुलढाणा जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीवर कारवाई सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत आतापर्यंत 42 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पाेलिसांनी 43 संशयित आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. या कारवाईत 2 वाहनांसह 5 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शिवारमध्ये दारुबंदी अधिनियमांतर्गत छापा घातला. यात हातभट्टी निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Weather Alert : छत्र्या बाहेर काढा! राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार

या छाप्यामध्ये 130 लिटर हातभट्टी, मोहा सोडवा 1200 लिटर, प्लास्टिक नळ्या 6 नग, पंधरा लिटर क्षमतेचे पतरी डबे 86 नग, जर्मन चरव्या 6 नग, 20 लिटर क्षमतेचे जार 5 नग, 10 लिटर क्षमतेचे 3 कॅन असा 59 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशिर व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply