Buldhana Crime : खळबळजनक! जावयाचा पत्नी आणि सासूवर जीवघेणा हल्ला; मायलेकी गंभीर जखमी

Buldhana : बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे माहेरी असलेल्या पत्नीला व सासूला जावयाने चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी खामगाव येथील आरोपी जावई नितीन कैलास तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी नितीन तायडे आणि त्याची पत्नी पुजा तायडे दोघांमध्ये वाद होते. त्यामुळे पत्नी पुजा माहेरी राहत होती. पतीसोबत वाद असल्याने पुजा तायडेने न्यायालयाकडे पोटगीसाठी अर्ज केला होता.

Jalna ST Bus Accident : जालन्यात एसटी बसचा भीषण अपघात; मुंबईकडे जाणारी बस पूलावरून खाली कोसळली

याचाच राग मनात धरुन नितीन तायडेने पत्नी पुजावर चाकूने हल्ला केला. यावेळी वाचवण्यासाठी आलेल्या सासूवरही त्याने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात माय-लेकी दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी पत्नी पुजा तायडेच्या तक्रारीवरुन आरोपी नितीन तायडे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply