Buldhana Accident : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; उभ्या ट्रकला बसची धडक, ३५ भाविक जखमी

Buldhana : आंध्रप्रदेशातील काही भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसला बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून बसमधील ३५ भाविक जखमी झाले आहेत. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई- कॊलकत्ता या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्या जवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. आंध्रप्रदेशातील काहीजण खासगी बस करून देवदर्शनासाठी निघाले होते. भाविकांची खाजगी बस रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास ३५ भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Kalyan : पलावा- काटई उड्डाणपूल मे अखेरीस होणार खुला; वाहतूक कोंडीपासून होणार सुटका

जखमींना दाखल केले रुग्णालयात

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे हे विभागीय गस्तीवर असतांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी मलकपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तर दहा जखमीना पुढील उपचारासाठी बुलडाणा रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

तीन दिवसांवपूर्वी याच ठिकाणी अपघात

दरम्यान अपघातातील जखमी सर्व भाविक आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक, शिर्डीला देवदर्शानासाठी जात होते. तीन दिवसा अगोदर देखील याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्यप्रदेश परिवहनची बस व विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन तीन जण ठार तर १८ जण जखमी झाले होते. यानंतर पुन्हा भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply