Lonar Sarovar : लोणार सरोवर परिसरात जाताय तर आधारकार्ड आवश्यक; अप्रिय घटना रोखण्यासाठी निर्णय

Buldhana : जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर परिसरात घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस, वनविभाग आणि भारतीय पुरातत्व विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे लोणार सरोवर परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. दरम्यान या परिसरात घनदाट अभयारण्य सुद्धा आहे. या अभयारण्यात पर्यटनाच्या नावाखाली अनेकदा अप्रिय घटना घडतात. गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यातील एका युवकाचा खून या अभयारण्यात झाला होता. त्यामुळे अशा अप्रिय घटना घडू नये; यासाठी यापुढे लोणार सरोवर परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आपले (Aadhar Card) आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. हा नियम येथे येणाऱ्या प्रत्येकासाठी लागू राहणार आहे.

Pune Dam Water Level: खडकवासला प्रकल्प ९३ टक्के भरले, कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा आकडेवारी

प्रवेशद्वारावर होणार नोंदणी

प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांना आधार कार्ड दाखवल्यावरच लोणार सरोवर परिसरात प्रवेश मिळणार आहे. आधार कार्डवरून पर्यटकाचे नाव आणि आधार क्रमांक याची नोंद झाल्याशिवाय या परिसरात प्रवेश मिळणार नाही. तसेच बिना आधार कार्ड जर कोणी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply