Buldhana Crime : सिनेस्टाईल पाठलाग सुरु असताना चोरट्यांच्या गाडीचा अपघात; पाच चोरटे पोलिसांच्या ताब्यात

 

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील मापारी गल्ली परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मुद्देमालासह अटक केली आहे. या घटनेतील पाच चोरट्यांनी एका कारमधून शहरात प्रवेश करत शरद लुनीया यांचे किराणा दुकान फोडले. परंतु चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असताना ते पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींनी बुलढाण्याच्या लोणार शहरातील मापारी गल्लीत असलेल्या शरद लुनिया यांच्या किराणा दुकानावर लक्ष्य ठेवले होते. रात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील काही रोख रक्कम आणि किरकोळ साहित्य चोरले. यानंतर चोरटे शहरातील आणखी काही दुकाने फोडण्याच्या तयारीत होते. मात्र शहरात गस्त घालणाऱ्या लोणार पोलिसांना त्यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या.

Pune Traffic : पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल, 'या' मार्गावर अवजड वाहनांना बंदी

पोलीस असल्याचे दिसताच काढला पळ

यानंतर लोणार पोलिसांच्या पथकाने चोरट्यांवर लक्ष ठेवले. मात्र पोलीस असल्याचे लक्षात येताच चोरटयांनी कार घेऊन घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. सिनेस्टाईलने काही अंतर पाठलाग करत असताना मेहकर रोडवर चोरट्यांच्या गाडीचा अचानक टायर फुटला. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून गाडीचा अपघात झाला.

मुद्देमालासह चोरटे ताब्यात

अपघात होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना ताब्यात घेतले. यामध्ये कृष्णा सुदाम छोडीदार, साहेबराव उर्फ बाप्पा पराजी (चालक), परमेश्वर अशोक गायकवाड या आरोपींना अटक केली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांच्याकडून चोरी केलेली रोकड आणि साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तसेच चोरीसाठी वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपास सुरु आहे.

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *