Building collapsed in Bhiwandi: भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली! ४० ते ५० जण दबल्याची शक्यता, बचाव कार्य सुरू

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीत वलपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Follow us -

भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारतीचे आहे. इमारतीच्या खालच्या भगत गोदाम होते यामध्ये 20 ते 30 जण काम करत होते. तर वरती रहिवासी होते. जीवितहानी होण्याची मोठी भीती वर्तवण्यात येत आहे. बचाव कार्य सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply