Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच गाजला. दादा भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने विरोधकांनी आज वातावरण चांगलंच तापवलं. संतप्त अजित पवारांनी हा उल्लेख रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली.
काय आहे प्रकरण?
दादा भुसे विधानसभेमध्ये संजय राऊतांसह ठाकरे गटावर टीका करत होते. संजय राऊत यांनी दादा भुसेंवर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना दादा भुसे राऊतांवर टीका करताना म्हणाले, "आम्हाला गद्दार म्हणणारे आमच्या मतांवर निवडून येणारे महागद्दार यांनी ट्वीट करुन लूट केल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. कोणत्याही माध्यमातून या ट्वीटची चौकशी करावी.
दादा भुसे पुढे म्हणाले, "या प्रकरणात मी दोषी आढळलो तर आमदारकीचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन. ह्यात काही खोटे आढळले तर महागद्दार, सामना संपादकांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे भाकरी मातोश्रीची खातात आणि मातोश्री शरद पवारांची करतात."
दादा भुसे यांच्या याच विधानावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर शरद पवार यांचं नाव रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणीही पवारांनी केली आहे. अजित पवार म्हणाले, "दादा भुसे, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. पण कारण नसताना पवार साहेबांचं नाव का घेतलं. माझी मागणी आहे, पवार साहेबांचं नाव रेकॉर्डवरुन काढून टाका."
दादा भुसेंनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावाही अजित पवारांनी केला आहे. पवार म्हणाले, "मंत्री दादा भुसे यांनी भूमिका मांडताना पवारसाहेबांचं नाव घेण्याची गरज नव्हती. शरद पवारांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला आहे. तुमचे शब्द मागे घ्या आणि दिलगिरी व्यक्त करा. "
शहर
महाराष्ट्र
- Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...
- Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?
- Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात
- Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया