Budget Session 2024 : सरकारने लाखो युवकांना नोकऱ्या दिल्या...

Budget Session 2024 : गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी संसदेत अभिभाषण केले. यावेळी त्यांनी राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक, अनुच्छेद ३७० आणि तरुणांना रोजगार या काही ठळक मुद्द्यांवर सरकारच्या विकासकामांची माहिती दिली.

नव्या संसद भवन इमारतीमधील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हे पहिले भाषण होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी याबाबत आठवण करून दिली. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याआधी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलचे अनुष्ठान केले गेले.

Ajit Pawar : राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप? अजित पवार गट अलर्ट मोडवर; आमदारांना दिल्या 'या' सूचना

 
भारतीय संविधान लागू होऊन आता ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षात भारताने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठलेत. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. तसेच जी२० शिखर परिषदेच्या यशामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणखी शक्तीशाली आहे अशी झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील विकासकामांचं कौतुक केलंय.
 
आमच्या सरकारने लाखो युवकांना नोकऱ्या दिल्या आहेत. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना लोकसभेत आरक्षण मिळाले, असं मुर्मू यांनी म्हटलं. भाषणात त्यांनी तिहेरी तलाखचा विषय देखील मांडला.

अर्थव्यवस्थेबाबत बोलताना मुर्मू म्हणाल्या की, एक देश, एक कर या योजनेचे चांगले परिणाम दिसत आहेत. देशात सर्वत बँकांचे जाळे आधीपेक्षा आता आणखी मजबूत झाले आहे. बँकाचे एनपीएमध्ये घट झाली आहे. आधीच्या तुलनेत परकीय गुंतवणूक दुप्पट झाली आहे. डिजिटल इंडियामुळे नागरिकांना व्यवसायात याचा मोठा फायदा होतोय. जगातील इतर देशही आता यूपीए सारखे व्यवहार आपल्याकडे सुरू करण्याचा प्रयत्न करतायत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply