Budget Session 2023 : हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज अहिरे भावूक; अधिवेशन सोडून जाण्याच्या तयारीत

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आपल्या लहान बाळाला घेऊन आल्याने आमदार सरोज अहिरे चर्चेत आल्या होत्या. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सरोज अहिरे यांची चर्चा होत आहे.

हिरकणी कक्षाची दुरावस्था झाल्याचं सांगत त्यांनी सुविधायुक्त आणि चांगल्या कक्षाची मागणी केली आहे. तसं न झाल्यास आपण अधिवेशन सोडून निघून जाऊ असा इशाराही दिला आहे.सरोज अहिरे यांनी याविषयी अध्यक्षांना पत्रही लिहिलं आहे. या पत्रात सरोज अहिरे म्हणतात, "सर्व शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करावा असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार, शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. मात्र विधान भवन मुंबईमध्ये असा कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही, पण हिवाळी अधिवेशन २०२२ मध्ये नागपूर विधान भवनात हिरकणी कक्ष होता. त्याप्रमाणे मुंबईतही महिला सदस्यांकरता बालसंगोपनासाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा."

माध्यमांशी बोलताना सरोज अहिरे भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. त्या म्हणाल्या, "नागपूरच्या अधिवेशनामध्ये हिरकणी कक्ष मिळाला होता. पण आत्ता मुंबईत जे हिरकणी कक्ष आहे, ते एका रुमचं नाव बदलून दिलं आहे. पण त्या रूममध्ये खूप धूळ आहे."

"माझ्या बाळाला बरं नाहीये तरीही मी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी इथं आलीये. सूडाचं राजकारण सोडून तुम्ही काम करा. सरकार माझं बाळ सांभाळू शकत नाही. मी आत्ता अधिवेशनात जात नाहीये. उद्या जर व्यवस्था झाली नाही तर मी उद्या नाशिकला निघून जाईन."



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply