Brazil Plane Crash : उड्डाण भरताच विमान गरागरा फिरलं अन् कोसळलं; 62 प्रवाशांच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

Brazil Plane Crash : ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात मोठी शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. 62 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान अचानक हवेत नादुरुस्त झालं. त्यानंतर हवेतच घिरट्या मारत हे विमान जमिनीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील सर्व 62 प्रवाशांचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या विमान दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

ब्राझीलच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचं होतं. प्रवाशांना घेऊन हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं.

Pune : मोठी बातमी! पुण्यातील नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका? पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

या विमानातून 58 प्रवासी आणि 4 विमान कर्मचारी प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, उड्डाण भरल्यानंतर अचानक विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर वैमानिकाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला.

काही क्षणातच विमानाने हवेत घिरट्या मारण्यास सुरुवात केली. वैमानिकाने विमानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं. अखेर 62 प्रवाशांसह उंच आकाशातून विमान थेट जमिनीवर कोसळलं.

विमान कोसळल्यानंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. या आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथून आगीचे मोठे लोळ दिसत होते. या विमान अपघाताचा थरार काहींनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला.

दरम्यान, विमान कोसळल्याचं कळताच संपूर्ण ब्राझील शहरात एकच खळबळ उडाली. विमान ज्या भागात कोसळलं तिथे अग्निशमन दलाची पथकं आणि बचाव पथकं तातडीने रवाना झाली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

मात्र, तोपर्यंत विमानातील 62 जणांचा कोळसा झाला होता. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. विमान नेमकं कशामुळे कोसळलं, विमानात आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनं संपूर्ण विन्हेडो प्रांतावर शोककळा पसरली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply