BrahMos Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्र पडलं महागात; सरकारला 24 कोटीचा दणका

BrahMos Missile : भारतीय हद्दीतून डागलं गेलेलं एक क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. या घटनेमुळं देशाला मोठा अर्थिक फटका बसला आहे. सरकारी तिजोरीचे २४ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

तसेच, या निष्काळजीपणासाठी भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडरसह तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे समर्थन केले. विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी भारतीय हवाई दलाच्या सेवेतून काढून टाकण्याच्या विरोधात याचिका केली आहे. 

या याचिकेला विरोध करताना केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी ‘रेकॉर्डवरील पुराव्याचे संवेदनशील स्वरूप तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाला क्षेपणास्त्राच्या गोळीबाराशी संबंधित महत्त्वाचे व्यावहारिक तपशील जाणून घेण्यात असणारा रस या पार्श्वभूमीवर कोर्ट मार्शलद्वारे तीन अधिकार्‍यांचा खटला चालवणे ‘अयोग्य’ आहे,’ असे नमूद केले आहे.

‘राज्याच्या सुरक्षेसाठी व्यापक परिणाम असलेल्या विषयाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन, याचिकाकर्त्याची सेवा समाप्त करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यात आला. भारतीय हवाई दलात २३ वर्षांनंतर असा निर्णय घेण्यात आला. कारण या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीनुसार अशी कारवाई करणे आवश्यक आहे,’ असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

9 मार्च रोजी चुकून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडले होते.पाकिस्तानने हे प्रकरण उपस्थित केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 मार्च रोजी संसदेत सविस्तर उत्तर दिले.ते म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्राचा अपघाती प्रक्षेपण झाल्याच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत."दुर्दैवाने 9 मार्च रोजी एक क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले. ही घटना नियमित तपासणीदरम्यान घडली. आम्हाला नंतर कळले की ते पाकिस्तानात उतरले होते," असे त्यांनी राज्यसभेत सांगितले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply