मुंबई हायकोर्टाने बीएमसीला फटकारलंImage Credit source: social media
रस्त्यांवरील अतिक्रमण रोखण्यात दुर्लक्ष केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला कठोर शब्दांत फटकारलं. तक्रारी असूनही कारवाई न होणे ही गंभीर चिंतेची बाब आहे असं न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने म्हटलं. पवई येथील एका शाळेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीशांनी हिरानंदानी परिसरातील सुमारे 90 फूट रुंदीच्या रस्त्यावर अतिक्रमणाचे चित्र पाहिल्यावर नाराजी व्यक्त केली. या रस्त्याच्या कडेला असंख्य झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत, ज्यामुळे शाळकरी मुले आणि सामान्य जनतेची मोठी गैरसोय होत आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर आयुक्तांना “घोड्यावरून” ऑफीसमध्ये येण्यास भाग पाडले जाऊ शकते, असा इशारा न्यायालयाने दिला.
कमिश्नर जर घोड्यावर बसून ऑफीसला जायला लागले, तर ते कसे दिसतील ?
या सुनावणीदरम्यान न्या. घुघे म्हणाले की, “सुरुवातीला या रस्त्यावर एका वेळी चार गाड्या जाऊ शकत होत्या, पण आताची परिस्थिती पहा… ती फक्त एका लेनवर आली आहे. येणाऱ्या काळात काय होईल याचा मला प्रश्न पडतो.. लोकांना मोटरसायकलचा वापर सोडावा लागेल आणि सायकल वापरायला सुरूवात करावी लागेल. किंवा सर्वांत उत्तम पर्याय म्हणजे घोडा आहे. गर्दीच्या रस्त्यातूनही घोड़ा नीट वाट काढू शकतो ना. विचार करा, तुमचे (BMC) कमिश्नर जर घोड्यावर बसून ऑफीसला जायला लागले, तर ते कसे दिसतील ? ” असा खोचक सवाल न्यायाधीशांनी विचारला.
“मुंबईचं काय चालले आहे? रस्ता बांधताच लोक त्यावर अतिक्रमण करतात… बघा तुम्ही तुमच्याच शहराचे काय करत आहात. इतका सुंदर रस्ता, आणि तुम्ही त्याचे काय केलंय?” असंही ते पुढे म्हणाले. आम्ही महानगरपालिकेच्या प्रमुखांना (आयुक्त) किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याला न्यायालयात बोलावू शकतो आणि त्यांच्याकडून यावर उत्तरे मागू शकतो असंही न्यायाधीशांनी खडसावलं.
कारवाई न केल्याचा आरोप
पवईतील शाळेच्या वतीने वरिष्ठ वकील नौशाद इंजिनिअर न्यायालयात हजर होते. बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत बीएमसी अधिकाऱ्यांकडे असंख्य तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या आणि अनेक बैठका झाल्या होत्या, परंतु कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला. नागरी अधिकारी टँकर आणि शौचालय सुविधांद्वारे पाणीपुरवठा करून अशा अतिक्रमणाला प्रोत्साहन देत आहेत असंही याचिकेत म्हटलं होतं. या परिसरात चार शाळा आहेत, जिथे पालक त्यांच्या मुलांना सोडायला आणि घ्यायला येत असतात, यामुळे वाहनांची गर्दी वाढते आणि अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होते असंही याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
यावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बीएमसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांना सूचनांसाठी वेळ दिला आणि त्यांनीजी कारवाई केली आहे, त्या कारवाईची माहिती न्यायालयाला देण्याचे आदेश दिले. ही अतिक्रमणं लवकरात लवकर काढून टाकावीत आणि रस्ता पूर्ववत करावा असे निर्देशही न्यायलयाने बीएमसीला दिले.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

