Bomb Threat In Mumbai : मुंबई पालिका मुख्यालयासह, महाविद्यालये अन् विमानतळाला बॉम्बने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा धमकी

Bomb Threat In Mumbai : मुंबईतील जवळपास ५० हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असलेल्या धमकीचा मेल आला होता. त्यानंतर आता पालिका मुख्यालय, कॉलेज आणि विमानतळावर देखील बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जवळपास ५० मोठ्या रुग्णालयांमध्ये धमकीचे ईमेल आलेत.

मेल करून बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. सलग आलेल्या धमक्यांमुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. तर मुंबईकरांमध्ये काही प्रमाणात दहशतीचं वातावरण दिसत आहे. आत्तापर्यंत काहीही संशयास्पद आढळल नसल्याची स्पष्टोक्ती मुंबई पोलिसांनी दिली आहे. धमकीचे मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात आज अन् उद्या कुठे-कुठे पडणार पाऊस? वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई पोलिसांना प्राथमिक तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ५० नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल प्राप्त झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. धमकी मिळालेल्या ठिकाणी अजून काही संशयास्पद सापडलेले नाही. असा मेल पाठवण्यामागे नेमका काय हेतु आहे, याचा देखील पोलीस शोध घेत आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply